Type Here to Get Search Results !

Crime News सुपा पोलिस ठाण्याची दबंग कामगिरी आंतर जिल्हा टोळी जेरबंद तर लाखोंचा माल हस्तगत

सुपा पोलिस ठाण्याची दबंग कामगिरी अंतर जिल्हा टोळी जेरबंद तर लाखोंचा माल हस्तगत
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सुपा पोलिसांनी हायवे वरील परमिट बियर बार फोडून मुद्देमाल चोरी करणारी आंतर जिल्हा टोळी  जेरबंद करून एकूण ८ लाख ५४ हजार २०  रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिन २८ रोजी रात्री सुपा-मोरगाव रोडवरील स्वागत हॉटेल व परमिट बार भोंडवेवाडी (ता बारामती) जिल्हा पुणे येथील हॉटेल मालक नामे कैलास महादेव हिरवे राहणार सुपा तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी सुपा पोलीस स्टेशन येथे येऊन गुन्हा रजिस्टर केल्याने सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंखे यांना घटनास्थळी रवाना केले. त्यानंतर चोरी घडलेल्या ठिकाणचे तसेच रोडवरील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, एक  मोटरसायकल वरून एक अनोळखी इसम व एक चारचाकी मधून ०२  अनोळखी इसम यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर मोटरसायकल व चार चाकी वाहन यांची माहिती घेतली असता, सदरचे वाहन हे शिक्रापूर व सणसवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सहाय्यक फौजदार ताकवणे, पोलीस हवालदार रुपेश साळुंखे पोलीस अंमलदार ताडगे, साळुंखे यांना गुन्हयात वापरलेले वाहने व आरोपी यांना गुन्ह्याच्या तपास कामी शोध घेऊन ताब्यात घेण्याकरता रवाना करण्यात आले. शिक्रापूर परिसरात इसम नामे 
१. ताजुद्दीन दस्तगीर शेख, मूळ राहणार टाकळवाडी ता.फलटण जिल्हा सातारा सध्या राहणार मलटण फाटा शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे,
२. गोरख काळूराम जाधव राहणार बोरखेडी तालुका सेनगा जिल्हा हिंगोली सध्या राहणार मलटण फाटा शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे 
३. अर्जुन गुढेराव रणदिवे राहणार विळेगाव तालुका देवणी जिल्हा लातूर सध्या राहणार सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे  व ईरटीगा चार चाकी नंबर MH 12 SQ 1425, मोटर सायकल नंबर MH 24 BU 1282  यांना गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता वरील इसमांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली. सदर अटक आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहने व चोरी करून नेलेली विदेशी दारू असा एकूण  ८ लाख ५४ हजार २०  रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंखे हे करीत आहेत.

( सुपा पोलीस यांच्याकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्व ग्रामपंचायत यांनी मुख्य रस्ते, चौक, मंदिर व हायवे वरील सर्व आस्थापना यांनी सुरक्षेतेच्या दृष्टीने व मालमत्ताविषयक गुन्हे कमी करण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत )
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती . आनंद भोईटे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग  गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहा.फौजदार शेंडगे ताकवणे, वाघोले पोहवा  ,राहुल भाग्यवंत, रुपेश साळुंखे  पोलीस नाईक लोंढे , पोलीस अंमलदार ताडगे, साळुंखे , जैनक, जावीर व वनवे महिला पोलिस अंमलदार तावरे यांनी मिळून केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test