Crime News "सोमेश्वर" परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट ; सोमेश्वर च्या माजी संचालकाचा घरामधील लाखोंचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
सोमेश्वरनगर : मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुक्यातील करंजेपुल-गायकवाडवस्ती तसेच शेंडकरवाडी परिरात अनेक चोरट्याने बऱ्याच घरफोडी केल्या आहेत त्या मध्ये श्री सोमेश्वर सह.साखर कारखान्याचे मा.संचालक रमाकांत गायकवाड यांचे घराचा समावेश आहे, घर बंद असल्याचा फायदा घेत तसेच शेजारीच असणाऱ्या त्यांच्या बंधूचे ही घर फोडून चोरट्यांनी तब्बल तीन लाख रुपये किमतीची चांदीची भांडी , कपडे सह सत्तर हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली , काही अंतरावर राहत असलेल्या विकास गायकवाड यांची मोटारसायकल चोरली पेट्रोल संपल्याने त्याठिकाणी सोडत चोरट्यांनी पळ काढला .काही वेळातच शेंडकरवाडी येथे गणेश शेंडकर यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही.ही घटना मंगळवार मद्यरात्री सुमारास घडल्याची माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजेपूल दूरक्षेत्राचे हवालदार रमेश नागटीलक यांनी दिली.
या वर्षीचा सोमेश्वर सह साखरकारखाना गळीत हंगाम चालू झाला आहे ऊस तोड कामगार विविध जिल्हा तालुका मधून सोमेश्वर भागात येत असतात याचा फायदा घेत अनेक चोरटे येत असल्या बाबत सोमेश्वर भागात चर्चा आहे.