"सोमेश्वर" चे विद्यमान संचालक अभिजित काकडे यांनी सातशे कुटूंबाला साखर देत दिवाळी केली गोड.
सोमेश्वनगर - बारामती तालुक्यातील निंबुत येथील श्री सोमेश्वर सह.साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे यांच्या माध्यमातून ईद निमित्त मुस्लिम बांधवांना तर दिवाळीनिमित्त हिंदू समाजातील गरजू कुटुंबीयांना दरवर्षीप्रमाणे साखर वाटप करीत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.,प्रदूषण व ध्वनीमुक्त दिवाळी साजरी करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असेही नम्र आवाहन काकडे यांनी केले.