ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर येणाऱ्या प्रथम सभेमध्ये "उपसरपंच"कोण...
उपसरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायतीचे सचिव यांनी सर्व सदस्यांना नोटीस द्याव्यात.
सोमेश्वरनगर - जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणूकीनंतर घेण्यात येणाऱ्या प्रथम सभेमध्ये उपसरपंच निवडणूकीबाबत.
आदेश ज्याअर्थी, मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ/ग्रापनि २०२२/प्र.क्र.१२/ का-०८, दि. ०३/१०/२०२३ नुसार नमूद केलेल्या माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदती संपणाऱ्या २३१ ग्रामपंचायतींच्या दि. ०५/११/२०२३ रोजी सार्वत्रिक निवडणूका घेणेत आलेल्या आहेत. त्याअर्थी, मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३० व ३३ (१) (२) नुसार, उक्त सार्वत्रिक निवडणूका घेणेत आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रथम सभेची तारीख
निश्चित करीत आहे, तसेच सदर प्रथम सभेमध्ये नवनियुक्त सरपंच यांचे अध्यक्षतेखाली, उपसरपंच पदाच्या निवडणूका घेण्याचे आदेश देत आहे.
मा. ग्रामविकास विभागांच्या सूचनांनुसार उपसरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ग्रामपंचायतीचे सचिव
यांनी सर्व सदस्यांना नोटीस द्याव्यात. सदर उपसरपंच पदाच्या निवडणूकीचे कामकाज ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतूदीनुसार चालविणेत यावे व मा. ग्रामविकास विभाग यांचेकडील पत्र क्र. ग्रापंनि-२०१७/प्र.क्र.१८६/पंरा-२, दि.०८/१२/२०१७ अन्वये तहसिलदार यांनी प्रत्येक
ग्रामपंचायतीच्या प्रथम सभेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून गट ब पेक्षा कमी नसलेल्या एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसेच ज्या ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद रिक्त असेल त्या ठिकाणी अध्यासी अधिकारी नेमून उपसरपंच निवडणूकीचे कामकाज पूर्ण करण्यात यावे. सदर प्रथम सभा सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मधील
तारखेस घेण्यात यावी.