होळ येथील बहुजन हक्क परिषद पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पदी पांडुरंग घळगे.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील होळ येथील युवा उद्योजक तसेच सामाजिक कामात अग्रेसर असणारे पांडुरंग घळगे यांची बहुजन हक्क परिषद पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल होळ ग्रामस्थांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुनीलतात्या धिवार यांच्या उपस्थितीत भव्य असा नागरी सत्कार समारंभ होळ गावठाण येथे रविवार दि ५ रोजी संपन्न झाला
तसेच चंद्रपूर या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती लाटे या प्रशालेचा विद्यार्थी यश दादासो नाळे यांनी लांब उडी क्रीडा प्रकारात १४ वर्षे
वयोगटात राज्यातून तिसरा क्रमांक मिळवून
ब्रांझ मेडल प्राप्त केल्या बद्दल बहुजन हक्क
परिषद यांच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला तसेच याप्रसंगी बहुजन हक्क परिषद
बारामती तालुका नवनियुक्त पदाधिकारी यांच्या
बरोबर संघटना वाढिसाठी चर्चा विनिमय करण्यात आली यावेळी युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नानासाहेब मदने,युवक अध्यक्ष बारामती तालुका
,अध्यक्ष बारामती तालुका अनिल कदम,
महिला अध्यक्ष बारामती तालुका मयुरी गुलदगड,
वाहतूक संघटना बारामती तालुका अध्यक्ष लालासो आगम,युवक सचिव बारामती तालुका राहुल जाधव सह इतर मान्यवर उपस्थित होते.