बारामती तील ३१ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली...
करंजे ग्रामपंचायत सरपंच पदी भाऊसाहेब हुंबरे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी मानाजीनगर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी काल मतदान पार पडले. आज बारामतीतील प्रशासकीय भवनात सोमवार रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीच्या नऊ फेऱ्या पार पडल्या.
●पहिल्या फेरीत
पानसरेवाडी,भोंडवेवाडी,आंबी बुद्रुक,गाडीखेल, म्हसोबानगर,पवईमाळ या ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली.
●दुसऱ्या फेरीत
करंजे, जराडवाडी, सिद्धेश्वर निंबोडी, मगरवाडी, दंडवाडी, कुतवळवाडी या ग्रामपंचायतींची मोजणी करण्यात आली. त्यानंतर
●तिसऱ्या फेरीत
चांदगुडेवाडी, साबळेवाडी, वंजारवाडी, चौधरवाडी, उंडवडी क.प, काळखैरेवाडी या ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. चौथ्या फेरीमध्ये सायंबाचीवाडी, धुमाळवाडी, करंजेपूल, कऱ्हावागज, कोऱ्हाळे खुर्द, पाचव्या फेरीत मेडद, शिर्सुफळ आणि पारवडी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. पारवडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा उमेदवार सरपंचपदी निवडून आला आहे.
●त्यानंतरच्या टप्प्यात
मुढाळे, सुपे, गुणवडी, डोर्लेवाडी आणि काटेवाडी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. यात सर्वच्या सर्व ठिकाणी अजित पवार यांच्या पॅनलचं वर्चस्व पाहायला मिळालं.
करंजे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक मध्ये सरपंच पदाचे थेट उमेदवार म्हणून नऊ सरपंच पदाचे उमेदवार होते ,बिनविरोध सदस्य म्हणून खुर्शिदा हसन मुलानी ,अप्सरा अमर मुलानी ,अशोक बापूराव होळकर हे निवडून आले तर बाकी सदस्य पदाची लढत ही अति चुरशीची ही लढत पहायला मिळाली. भैरवनाथ परिवर्तन पॅनलचे उमेदवार मयुरी प्रताप गायकवाड, महेश हरिभाव पाटोळे, सचिन सुभाष पवार हे होते ते चांगल्या मतदात्यांनी मतदान देत निवडून दिले तर जनतेतून थेट सरपंच पदाचे उमेदवार असल्याने भाऊसाहेब फुलाजी हुंबरे यांना १६५ मतांनी मत देत जनतेने सरपंच म्हणून निवडू दिले.
गावकऱ्यांनी सरपंच म्हणून निवडून देत माझ्यावर जो विश्वास दिला तो मी सार्थ ठवेल व नवनिर्वाचित सर्व सदस्यांना सोबर घेत करंजे गावचा विकास हेच माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले
नवनिर्वाचित सरपंच भाऊसाहेब हुंबरे