वाढत्या चोऱ्यांमुळे करंजे परिसरात युवक वर्गाचा रात्रीच्या गस्तीला मोठा प्रतिसाद
माझे गावं माझी जबाबदारी या संकल्पनेचा अवलंब करावा - नवनिर्वाचित सरपंच भाऊसो हुंबरे
सोमेश्वरनगर - बारामती तील वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव पोलीस स्टेशन व करंजेपुल दुरक्षेत्र हद्दीत काही दिवसांपासून चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने रात्रीची गस्त युवक तरुणांनी गावोगावी घालावी असे पोलीस प्रशासन मार्फत करण्यात आले आहे या आव्हाहन ला प्रतिसाद देत करंजेगाव परिसरातील देऊळवाडी ग्रामस्थ मिटिंग घेऊन केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन, देऊळवाडी, माळवाडी, जोशीवाडी, रासकर मळा येतील युवकांनी एकत्र येत रात्र गस्त पथक तयार करून आपल्या वाड्यावस्त्याची सुरक्षा वाढवली त्यामुळे ग्रामस्थांनी सर्व तरुणांचे अभिनंदन केले. तसेच सर्व नागरिकांनी माझे गाव माझी जबाबदारी या संकल्पनेचा वापर करत सर्वांनी सतर्क राहणे तितकेच महत्त्वाचे आहे असे बोलताना नवनिर्वाचित सरपंच भाऊसो हुंबरे यांनी सांगितले
माझे गावं माझी जबाबदारी या संकल्पनेचा अवलंब करावा