सोमेश्वरनगर ! पोलिस पाटील यांना मार्गदर्शन व नवनिर्वाचित पोलिस पाटील यांचा सत्कार
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथे नवीन पोलीस पाटील यांचा सत्कार व गावा, गावामध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यासाठी आवाहन ..
वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व पोलिस पाटील यांची मिटिंग मा.गणेश इंगळे सो.उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी मा.गणेश इंगळे सो.यांनी सर्व पोलिस पाटील यांना मार्गदर्शन केले .परिसरातील प्रत्येक गावामध्ये माझ गाव माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात यावा तसेच प्रत्येक गावामध्ये मजबूत ग्रामसुरक्षा यंत्रणा उभी करण्याबाबत पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करण्यात आले.मागील काही दिवसापासून परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून गावामध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा मजबूत असेल तर चोरीचे प्रमाण कमी होईल ,व आरोपीस पकडण्यास मदत होईल .या प्रसंगी नवीन पोलिस पाटील कोयल बनकर माळवाडी , मनिषा कदम जळकेवाडी , मनीषा साळवे निंबूत , प्रवीण शिंदे देऊळवाडी व गणेश काकडे वाणेवाडी यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिस पाटील श् हनुमंत विलास जगताप वाकी , सौ रूपाली वाघमारे लाटे ,सौ रजनी मोरे मोढवे ,राजकुमार शिंदे चौधरवाडी यांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले यावेळी मा.सचिन काळे सहाय्यक पोलिस निरीक्षक वडगांव निंबाळकर यांनी सर्वांचे आभार मानले.