ग्रामपंचायत निवडणुक मतदानासाठी तरुण पिढी, महिला तसेच ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...सरपंच,सदस्यांचे भवितव्य मतपेटीत
सोमेश्वरनगर - पुणे जिल्ह्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवार आज (दि.५) रोजी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आपला निवडणुकीचा हक्क तरुण पिढी, महिला तसेच जेष्ठ ही सकाळ पासून बजावत आहे.. मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मतदानासाठी पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी उभे राहिलेले सरपंच,सदस्यांचे भवितव्य मतपेटीत आज बंद होणार,वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्या मार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेला आहे.
.