सिध्दीराजनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था मार्फत दिपावली निमित्त डिव्हिडंट वाटप.
सोमेश्वरनगर- सिध्दीराजनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था मर्या. सोरटेवाडी ( ता बारामती)मार्फत सभासद गवळी यांना दिपावली डिव्हिडंट वाटप सभासद गवळी यांना ५०/२५ = ७५% प्रमाणे करण्यात आले, गेली १८ वर्ष सिध्दीराजनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था ही सोमेश्वर भागातील मुरूम, वाणेवाडी, करंजे,करंजेपुल तसेच सोमेश्वर परिसरातील सर्व गावे तर होळ,को-हाळे सह परिसरात कार्यरत आहे, त्यांचे माध्यमातून बऱ्याच गवळी सभासदांना फायदा झाला असल्याचे उपस्थित गवळी यांनी सांगितले तसेच या दूध उत्पादक संस्थेमध्ये दररोज 4 हजार 500 दूध संकलन केले जाते तर ह्या दूध संस्थेत 275 गवळी सभासद आहे. गेले 18 वर्ष सातत्याने काम केल्याने अधिकाधिक गवळी व गोरगरीब गवळी यांना दूध उत्पादनासाठी गाई देण्याची व्यवस्था ही संस्था करत असते तसेच त्यांनी आजपर्यंत 250 गाई वाटप करून दिल्या असल्याचे चेअरमन जालिंदरअण्णा सोरटे व सचिव किरण सोरटे यांनी बोलताना सांगितले तसेच सिध्दीराजनाथ सहकारी दूध उत्पादक संस्था मधील सर्व गवळी सभासद ,कर्मचारी वृंद याना येणाऱ्या दीपावली शुभे दिल्या.