सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या तनुष्काच्या पदकांच्या संख्येत सातत्याने वाढ.
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ७ वी मध्ये शिकणाऱ्या तनुष्का शिवाजी भुजबळ हिने जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे आयोजित ज्यूदो स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली असून तिने १४ वर्षाखालील ४४ किलो वजन गटातून कास्यपदक मिळवले. तनुष्काच्या विविध स्तरावरील ज्यूदो स्पर्धांमधील सातत्यपूर्ण चमकदार कामगिरीमुळे शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी खूप कौतुक केले व भविष्यातील तिच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तनुष्काला शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजीत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.