स्तुत्य उपक्रम ! माहेरवाशीनिंच्या आगमनाने फुलली माळेगाव बु.नगरी...
दीपावलीनिमित्त "स्नेहसोहळा माहेरचा" संपन्न.
बारामती प्रतिनिधी :-
"माझे माहेर पंढरी, आहे बोरी च्या ग तीरी" हे गीत गुणगुणत माळेगाव बुद्रुक येथील शेकडो विवाहित लेकी (Married Leckie) एकाचवेळी गावात दाखल झाल्याने या लेकींच्या आगमनाने माळेगाव बु.नगरी फुलली होती, जय भवानी तरुण मंडळ, चव्हाणवस्ती समस्त चव्हाण व जगताप परिवार, चव्हाणवस्ती यांच्या संकल्पनेतून विवाहित झालेल्या शेकडो लेकींचा स्नेहमेळावा (Sneh Mela) नुकताच पार पडला.
"लेक माहेराच सोन , लेक सौख्याच औक्षण"
"लेक बासरीची धूण, लेक अंगणी पैंजण"
"लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण"
"लेक रंगांच शिंपण, लेक गंध हळव मन"
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे प्रथमच दिवाळीनिमित्त असा आगळावेगळा " स्नेह मेळावा माहेरचा" असा कार्यक्रम राबवला यामध्ये अनेक महिला भगिनींनी हजेरी लावली तर या कार्यक्रमास चव्हाण वस्तीवरील सर्व लहान थोर व्यक्तीं एकत्र येत "माहेरचा स्नेह सोहळा" या नावाने मुलींचा सन्मान करताना त्यांना माहेरची ओटी एक "वास्तूदिवा" आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माळेगाव सह. साखर कारखाना चेअरमन केशवराव जगताप,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक रनजीतभैय्या तावरे, योगेशभैया तावरे , सौ.प्रतिभाकाकी तावरे ,सौ.शांताबाई जगताप उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय चव्हाण यांनी मांडले
हा कार्यक्रम चव्हाण वस्तीवरील सर्व लहान थोर व्यक्तींनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला सासरी गेलेल्या सर्व महिलांचे सहकुटूंब उपस्थित होते,माहेरी आलेल्या सर्व महिलांनी देखील सर्व कुटुंबातील सर्वांना
भेटवस्तू देत आपले कर्तव्य केले.
उपस्थित मान्यवरांनी या अनोख्या सोहळ्याचे तोंडभरून कौतुक करत बारामती तालुक्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे आवर्जून सांगितले. लेकींना मायेची ऊब देणाऱ्या या सोहळ्याच्या निमित्ताने वस्तीवर अतिशय उत्कृष्ट सजावट करण्यात आली होती,या सोहळ्याने लेकीं तर सुखावल्याच मात्र आपल्या लेकींचा सन्मान पाहून त्यांचे कुटुंब देखील भारावले होते.जाताना खरे आनंदाश्रु ढाळत प्रत्येक लेकीने माहेच्यांचा निरोप घेतला , सहकार्य दीपक चव्हाण,शेखर चव्हाण संतोष जगताप ,कृष्णांत चव्हाण तर कार्यक्रमाचे आयोजक जय भवानी तरुण मंडळ होते.