बारामती ! अटल भूजल योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बारामती : अटल भूजल योजनेअंतर्गत समाविष्ट गावांमधील शेतकऱ्यांनी संरक्षित शेती- हरितगृह, शेडनेट, पॉलिटनेल घटकासाठी वाढीव प्रोत्साहनपर अनुदानासाठी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी केले आहे.
अटल भूजल योजनेत तालुक्यातील ७३ गावांचा समावेश असून या गावांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत संरक्षित शेती- हरितगृह, शेडनेट, पॉलीटनेल या घटकासाठी शेतकऱ्यांना विविध आकारमान व मॉडेल नुसार ७५ टक्के अनुदान देण्यात येते. योजनेच्या कार्यक्षम पाणी वापर या उद्देशानुसार संरक्षित शेती घटकाकरिता प्रोत्साहन निधीच्या माध्यमातून अतिरिक्त २५ टक्के पूरक अनुदान देण्यात येणार आहे. बिगर अटल भूजल योजनेच्या गावांसाठी नियमित प्रमाणे ५० टक्के अनुदान संरक्षित शेतीसाठी आहे, अशी माहिती श्रीमती बांदल यांनी दिली आहे.