आजी माजी सैनिक संघटना वतीने नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार...
माजी सैनिकांची जीवन प्रमाणपत्र;सैनिक स्वयंसहायता महिला बचत गट डिव्हिडंड वाटप.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात तसेच विविध सामाजिक क्षेत्रात आजी माजी सैनिक संघटना नेहमीच अग्रेसर असते त्यांनी कोरोना काळात तसेच दरडग्रस्त भागात संघा मार्फत त्यांनी मोठी मदत पोच केली तसे त्यांचे कौतुक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सह इतर मान्यवरांनीही केलेले आहे , विविध सामाजिक कार्य व सैनिकां कुटुंबाविषयी असणारे तंटे ते पाठपुरावा करत सोवीत असतात , तालुका बारामती आजी-माजी सैनिक संघ वतीने सोमेश्वर करंजेपूल येथे सोमवार दि १३ रोजी सोमेश्वर येथील संघटना कार्यलायत सोमेश्वर पंचक्रोशीतील नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली यामध्ये नवनिर्वाचित सरपंच ,सदस्य यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
माजी सैनिकांची जीवन प्रमाणपत्र भरण्यात आले. यासाठी सहकार्य संघटना सदस्य महेश दिनकर पाठक यांनी दिलेल्या वेळी तालुक्यातील सर्वच माजी सैनिकांचे जीवन प्रमाणपत्र स्वतःचा अनमोल वेळ देऊन पूर्ण केली. राहिलेल्या माजी सैनिकांचे देखील जीवन प्रमाणपत्र भरण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. वीर नारी सूळ मॅडम यांना साडी व मिठाई देऊन त्यांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच सोमेश्वर करंजे पूल पंचक्रोशीतील सरपंच व सर्व सदस्य यांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी करंजेपुल सरपंच पुजा वैभव गायकवाड, करंजे सरपंच भाऊसो हुंबरे, चौधरवाडी सरपंच शशिकांत पवार तसेच मगरवाडी सरपंच विनीता हगवणे तसेच सदस्य व सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसाहेब लकडे या सर्वांचा शाल नारळ पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सैनिक स्वयंसहायता महिला बचत गट नंबर वन या गटातील सर्व सदस्यांना बचत गटाद्वारे प्रत्येकी दहा हजार रुपये डिव्हिडंड वाटण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर सैनिक संघटना संस्थापक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, कायदेशीर सल्लागार Adv गणेश आळंदीकर वकील तक्रार कमिटी ,आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,उपाध्यक्ष भगवान माळशिकारे ,उपाध्यक्ष माळेगांव शेलार साहेब,सचिव रामदास कारंडे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, नितीन शेंडकर,सुभेदार ताराचंद शेंडकर, मोहन शेंडकर, ज्ञानेश्वर कुंभार जेष्ठ सल्लागार राजाराम शेंडकर, गणेश शेंडकर, दत्तात्रेय चोरगे, संघटनेचे सह खजिनदार रवींद्र कोरडे, अण्णा चौधरी, महेश दिनकर पाठक तसेच पत्रकार विनोद गोलांडे सह माजी सैनिक व सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेची प्रस्तावना सल्लागार गणेश आळंदीकर साहेबांनी केले. मनोगत उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांनी मांनले ,संघटना संस्थापक जगन्नाथ लकडे यांनी संघटनेबद्दल व संघटनेची स्थापनेची वैशिष्ट्ये सांगितली. आभार सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर मानले.