सोमेश्वर भागात चोरांचा सुसूळाट ; सर्वच गावांमध्ये तरुणांकडून गस्त प्रमानात मोठ्या संख्येने वाढ
सोमेश्वरमनगर - सध्या चोरट्यांचे वाढत असल्याने सोमेश्वर परिसरातील सर्वच गावांत तर वाडीवस्ती वरील गस्त घालण्याचे प्रमाण वाढवले आहे तर यामध्ये नवीन तरुण पिढी सक्रिय आहे ,करंजेपुल दुरक्षेत्र येथे पोलीस यंत्रणेत वाढ असावी या संदर्भात परिसरातल्या व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज फिरत आहे
सोमेश्वर कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम चालू असल्याने या ऊसतोड कामगारांमध्ये अनेक चोरटे आल्याचेही नागरिकाकडून वर्तवले जात आहे कारखाना व पोलीस प्रशासन यांनी त्याची सखोल माहिती घ्यावी अश्या सूचना प्रसार माध्यमाच्या माध्यमातून फिरत आहे .... काल मध्यरात्री सोमेश्वर परिसरातील करंजेपूल ,शेंडकरवाडी येथील चोरट्यांचा डाव फीस्कटला आहे या घटनेची दक्षता घेत मद्य रात्री १२ ते ४ या वेळेस तरुणपिढीने गस्तीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवले असल्याचे तरुणांनी बोलताना सांगितले.