CRIME NEWS सुपे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
बारामती - बारामती तालुक्यातील सुपे परिसरामधील शेतकरी मोटार चोरीने हैराण झाला होता. त्यातच सुपा पोलिसांनी मोटार चोरांच्या मुसक्या
आवळल्या सुपा पोलीसांनी शेतक-याचे विदयुत मोटार पंप व केबल चोरणाऱ्या दोन जणाला जेरबंद करून एकुण ८ गुन्हे उघडकीस आणले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम बनवुन शेरेवाडी परिसरात रात्रगस्त करीत असताना एक संशयित विना
नंबरची ज्युपीटर स्कुटी मोटार सायकल भरधाव वेगाने शेरेवाडी, लोणी पाटी मार्गे तरडोली गावाच्या दिशेने गेली. सदर गाडीचा पाठलाग करून संशयित
मोटार सायकल थांबवुन मोटार सायकलवरील दोन इसमांना त्याचा नांव पत्ता विचारता त्यानी त्याचे नांवे १) सुनिल हनुमंत रेवडे वय ३० वर्षे रा. शेरेवाडी
ता. बारामूती जि. पुणे २) विश्वनाथ श्रीरंग कांबळे वय ३२ वर्षे रा. तरडोली ता. बारमाती जि. पुणे असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता
त्याचेकडे २ हातोडे, २ एक्सपाने, १ एक्सा ब्लेड मिळुन आले त्यावेळी वरील नमुद इसमांकडे सखोल चौकशी केली असता त्यानी शेरेवाडी, बाबुर्डी,
मोरगाव, सुपे, पानसरेवाडी, काळखैरेवाडी या गावचे परिसरातील शेतक-यांचे ६ विद्युत मोटार पंप, व ५ ठिकाणचे ६१५ फुट तांब्याची केबल चोरलेचे
चौकशीमध्ये निष्पन्न झाले तर