सोमेश्वरनगर ! वाणेवाडी येथे नवरात्री उत्सव निमित्त अनोखा उपक्रम
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे श्री हनुमान मंदिरासमोर नवरात्री उत्सवा निमित्त आज मातृ पितृ देवो भव या वाक्यानुसार अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात ह. भ. प. स्वप्नील महाराज काळणे युवा कीर्तनकार / प्रभोधनकार / व्याख्याते यांचे बालसंस्कार या विषयी व्याख्यान शनिवार दि २१ रोजी ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक लहान मुलांनी आपले आई- वडील यांचे ओक्षण करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे समाजात चांगली परंपारा रूढ होईल असे मत सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या सुविद्य पत्नी रोहिणी जगताप यांनी व्यक्त केले. ज्या माता पितांनी आपणास जन्म दिला त्यांच्याविषयी आदर व्यक्त करून समजास आपण नवीन आदर्श उभा करू शकतो हे या उपक्रमातून समजते.