मु सा काकडे महाविद्यालयात 'हवाई दलातील सुवर्णसंधी' या विषयावर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन...
इयत्ता अकरावी /बारावी विज्ञान विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर व्याख्यानाचा लाभ घ्यावा-प्राचार्य डॉ वायदंडे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक २०/१०/२०२३ रोजी इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी 'हवाई दलातील (Airforce) सुवर्णसंधी' या विषयावर विंग कमांडर आर. सचिन,कमांडिंग ऑफिसर, 6ASC मुंबई यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा लाभ घ्यावा.
बारावी विज्ञान नंतर हवाई दलामध्ये असणाऱ्या विविध संधी व त्या अनुषंगाने करावयाची तयारी यासाठी हे मार्गदर्शन अतिशय मोलाचे असणार आहे त्यासाठी सध्या हवाई दलामध्ये कार्यरत असणारे विंग कमांडर आर. सचिन उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा.अभिजीत भैय्या काकडे- देशमुख व प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी दिली.