पायदळ दिवस कार्यक्रमासाठी माजी सैनिकांनी हजर राहण्याचे ....या तारखेला आवाहन
पुणे : मुख्यालय दक्षिण कमान, पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय युध्द स्मारक, दक्षिण कमान, घोरपडी येथे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.१५ वा. पायदळ दिवस साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील पायदळ बटालियनमधून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. माजी सैनिकांनी त्यांच्या उपस्थितीबाबतची माहिती भ्रमणध्वनी क्रमांक ८२०८०९६२५८ किंवा दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२२८७ वर देण्यात यावी, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.