महत्वाची बातमी ! मु. सा. काकडे महाविद्यालयात ....'पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावाचे आयोजन...
पाच हजार युवकांना मिळणार रोजगाराची संधी
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात शुक्रवारी १३ ऑक्टोबर सकाळी १० वाजता 'महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जवळपास पन्नास राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून सुमारे पाच हजार पदे युवकांसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष अभिजित काकडे व प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यसेच मु. सा. काकडे महाविद्यालय व विप्रा स्किल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा' आयोजित करण्यात आला आहे.
मेळावा जिल्हाधिकारी राजेश देशमुख, 'विप्रा'चे संचालक विकास चव्हाण आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. मेळाव्याचे उदघाटन उपमुख्यमंत्री तथा मपुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार , हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
शासकीय पातळीवरील मेळावा असल्याने राज्यातील विविध कंपन्या उपस्थित राहणार आहेत. दहावी, बारावीसह सर्व प्रकारचे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच आयटीआय, डिप्लोमा, इंजिनीरिंग, एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. काही कंपन्यांना कौशल्य असणारे विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर ट्रेनिंग देऊन रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन उद्योजकता विभागाचे सहायक संचालक संतोष जाधव व मु सा काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अधिक माहितीसाठी संपर्क -
डॉ. नारायण राजूरवार - 9823824248
अमोल काकडे - 9561101750
प्रा. दत्तात्रय जगताप - 9420319443