सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या तनुष्काची ज्युदो स्पर्धेत चमकदार कामगिरी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ७ मध्ये शिकणारी तनुष्का शिवाजी भुजबळ हिने चित्रकुट इंटरनॅशनल स्कूल दरेवाडी, अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या झोन लेवल ज्युदो स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदक मिळवले असून तिची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ज्युदो सारख्या शारीरिक चपळाई व शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या तसेच पुरुषी खेळ म्हणून मान्यता असलेल्या खेळांमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मुलींनी भरीव कामगिरी करून दाखवल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी स्पर्धकांचे अभिनंदन केले. शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांचे स्पर्धकांना बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.