सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या काकडेची 'यशवंत' कामगिरी.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील १० वी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी यशवंत महेंद्र काकडे याने दिनांक २६/ १०/२०२३ ते २९/१०/२०२३ रोजी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भाला फेक या खेळ प्रकारांमध्ये १७ वर्षाखालील गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली. यशवंतची रायपूर छत्तीसगड येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील भालाफेक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी यशवंत व त्याच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांचे मार्गदर्शन यशवंतला लाभले.