आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा शालेय वस्तू देत वाढदिवस साजरा
सोमेश्वरनगर - शालेय वस्तू देत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा ५९ वाढदिवस आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला, यावेळी आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, जेष्ठ मोहन शेंडकर,कार्याध्यक्ष नितीन शेंडकर इ. उपस्थित होते.