पुरुषोत्तम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न.
५४ जेष्ठ नागरिक तर ६४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
सोमेश्वरनगर - श्री सोमेश्वर सह.साखर कारखाना याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीतील करंजेपूल येथील मेडिसिटी मेडिको अँड पॉलीक्लीनिक यांच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरांमध्ये ५४ ज्येष्ठ नागरिकांचे बीपी शुगर ईसीजी याची मोफत तपासणी करण्यात आली ६४ महाविद्यालयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी मोफत करण्यात आली.बारामती येथील आरोग्य हॉस्पिटलचे हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ. राहुल जाधव यांनी रुग्णांच्या शंकाचे निरसन केले.या आरोग्य शिबिराचे उद्घाटन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन शिंदे व संग्राम सोरटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
या प्रसंगी युवा उद्योजक स्वप्निल गायकवाड ,भाऊसाहेब सूर्यवंशी,शहाजान बानदार, गणेश सावंत ,श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य शिबिराचे आयोजन मेडिसिटी मेडिको अँड पॉली क्लिनिकचे विजय संभाजीराव भापकर यांनी केले