भारतीय युवा पँथर संघटनेच्या उपोषणाला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देऊन कर्मचारी उपोषणात सहभागी होणार
बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील कंत्राटी कर्मचारी गुरुवार दिनांक ०२/११/२०२३ पासून रुग्णालयासमोर समोर उपोषणाला बसणार आहेत.भारतीय युवा पँथर संघटनेच्या उपोषणाला सर्व कंत्राटी कर्मचारी यांनी पाठिंबा देत सर्व कर्मचारी उपोषणात सहभागी होणार आहेत.सदर उपोषणाचा विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय बारामती येथील कंत्राटी कर्मचारी यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या.तसेच कर्मचारी व कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मोफत उपचार रुग्णालयात मिळावा.अशी मागणी कर्मचारी यांची आहे.सदर मागणीसाठी भारतीय युवा पँथर संघटना रुग्णालयासमोर उपोषण करणार आहे.सदर उपोषणात कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत.
जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत उपोषण कर्मचारी करणार असे कर्मचारी यांनी सांगितले.उपोषणाबाबत पत्र व्यवहार कर्मचाऱ्यांनी केला आहे.भारतीय युवा पँथर संघटना कर्मचारी यांच्यासाठी लढा देत राहणार असल्याचे भारतीय युवा पँथर संघटना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिववळे यांनी सांगितले.महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभम गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.