ऊस शेतात अंतर्गत पीक म्हणून सोयाबीन ठरतेय फायद्याचे; 'सोमेश्वर' भागात सोयाबीन शेंगाने बहरलेल्या स्थितीत.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे उसाच्या लावणीच्या पिकामध्ये सोयाबीन पीक शेतकऱ्यांकडून घेण्यात आले आहे. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्र असल्याने या भागात मुख्य पीक म्हणून ऊस केला जातो परंतु परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी अंतर्गत पीक म्हणून सोयाबीन पीक घेणे पसंत केले आहे...सध्या सोमेश्वरनगर परिसरात सोयाबीन पीक अतिशय चांगल्या प्रकारे आहे... मोसमी पावसाने तसेच परतीच्याही पावसाने ओढ दिल्याने विहिरीच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी हे पीक घेतले आहे .एका सोयाबीन पीक असलेल्या प्लॉटला शेतकरी मित्रपरिवार भेट देऊन समाधान व्यक्त करताना दिसत आहे ते माजी सैनिक तसेच सध्या शेतात रमलेले नितीन शेंडकर या शेतकऱ्यांनी जेएस ३३५ या वाणाचे ऊस अंतर्गत पीक म्हणून सोयाबीन घेतले आहे ते झाड सध्या शेंगाने भरले असून एका झाडाला ९० ते १०० शेंग आली असल्याने समाधान, थोड्या दिवसांनी ते काढणीला येणार आहे ... ऊस अंतर्गत पीक असले तरी सोयाबीन पीक चांगल्या पद्धतीने आले आहे..पुढे चांगला बाजरभाव मिळाला तर खर्चाच्या दुप्पट फायदा होणार आहे तसेच ऊस पिकामध्ये असल्याने त्याचा ऊस शेतीला खत स्वरूपात बेवड होणार आहे त्यामुळे शेतातील ऊस पिकाला ही ते चांगले असणार आहे असे बोलताना शेंडकर यांनी सांगितले.