बारामती ! 'मेरी पॉलिसी मेरे हात' अंतर्गत विमा पॉलिसीचे बारामती येथे वितरण
बारामती : मृग बहार योजनेतील डाळींब, सीताफळ फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना भारतीय कृषी विमा कंपनीच्यावतीने 'मेरी पॉलिसी मेरे हात' या उपक्रमाअंतर्गत विमा पॉलिसीचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वितरण करण्यात आले.
यावेळी सांख्यिकी कृषी पर्यवेक्षक संतोष मोरे, कृषी पर्यवेक्षक मिलिंद चांदगुडे, तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव यांचे हस्ते विमाधारक शेतकऱ्यांना पॉलिसीचे वितरण करण्यात आले.
आंबिया बहार फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी ३१ ऑक्टोबर २०२३, आंबा ३१ डिसेंबर २०२३ आणि डाळींब या फळपीकासाठी १४ जानेवारी २०२४ पर्यंत आहे. तरी शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.