सोमेश्वरनगर ! ऊस गाळप हंगाम सन २०२३-२४ मध्ये सभासदांच्या उस गाळपास प्राधान्य देणे
दिपावली निमित्त तात्काळ ३० किलो साखर वाटप न केल्यास शेतकरी कृती समितीच्या वतीने मोर्चा वेळ पडल्यास उपोषणही करणार - सतिशराव काकडे
सोमेश्वरनगर - श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याना हंगाम २०२३ २४ चा मोळी
पुजन कार्यक्रम नुकताच पार पडला असुन १ नोव्हेंबर पासुन उस गाळपास सुरूवात होणार आहे. तरी शेतकरी कृती समितीच्या वतीने कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळास आवाहन करण्यात येत आहे की.कारखान्याने सभासदांच्या सातव्या महिन्यातील अडसाली लागणीचे संपुर्ण गाळप केल्या शिवाय बाहेरील एक टन ही गेटकेन उस गाळपास आणु नये. सध्या आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पाऊस काळ कमी झाल्याने पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. सभासदांनी यंदा उस लागवडी केलेल्या आहेत तो उस बांधणी
करून त्यास सभासदांनी एकरी ३० ते ४० हजार रूपये खर्च केलेला आहे. सभासदांनी आत्ता जाणारा उस जगवायचा की केलेल्या लागणी जगवायच्या हा प्रश्न शेतकरी सभासदांच्या पुढे उभा राहिलेला आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याच भागात हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच लोड शेडींगमुळे लाईटची परिस्थिती काय आहे हे संचालक मंडळाला सांगायची गरज नाही. त्यामुळे कारखान्याने जर सुरूवाती पासुन गेटकेन उसाचे गाळप केल्यास सभासदांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारखान्याने जे परिपत्रक काढले त्यात
सभासदांचा अडसाली उस १७ ते १८ महिन्यांमध्ये नेहणार असल्याचे हे नमुद आहे. परंतु सुरूवातीपासुन गेटकेन उस आणल्यास सभासदांच्या अडसाली उसाची तोडणी १८ ते २१ महिन्यापर्यंत उशिरा होणार आहे. त्यामुळे
उभ्या उसास पाणी देता येणार नाही त्यामुळे टनेज घटणार आहे. तसेच सभासदांच्या उसाचे गाळप सुरूवाती पासुन न केल्यास परिसरातील सर्वच कारखान्यांना उस कमी असल्याने आपल्या कार्यक्षेत्रातील परिपक्व रिकव्हरीचा उस बाहेरील कारखान्यांना गाळपास जाणार आहे. तरी कारखान्याने गेटकेनचा कवळा उस गाळपास
आणुण रिकव्हरी पाडु नये. प्रथमतः सभासदांचा नोंद असलेला सातव्या महिन्यातील अडसाली उसाचे गाळप श्री सोमेश्वर सहसाखर कारखाना लि.
सहवाधर क 6/10/2093 करावे व नंतरच गेटकेनचा परिपक्व उस आणावा.काही वर्षा पूर्वी कारखाना विस्तारीकरणा वेळी मा. अजितदादा यांचे सांगण्यावरून VSI अधिकारी,शेतकरी कृती समिती व संचालक मंडळ यांच्यामध्ये झालेल्या मिटींगमध्ये चर्चा करून एकत्रीत निर्णय घ्यावा असे सांगितले होते. त्या मिटींगमध्ये नेअरमन यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये १६ ते २२ लाख मे.टन उस उपलब्ध असल्याचे चित्र निर्माण करून विस्तारीकरण केले. त्यावेळी शेतकरी कृती समितीने एवढे मोठे
विस्तारीकरण न करता १००० मे.टन ते १५०० मे. टन विस्तारवाढ करावी एवढीच सुचना केली होती. परंतु चेअरमन यांनी स्वतःच हित जपण्यासाठी कारखाना व सभासदांना कर्जाच्या खाईत घातले. मग आत्ता चेअरमन यांच्या म्हणण्याप्रमाणे कार्यक्षेत्रातील १६ ते २२ लाख मे.टन उस गेला कोठे? आणि आत्ता तेच चेअरमन सांगतात की चालु हंगामात १२ लाख मे.टन उस उपलब्ध आहे की ते सुध्दा खोटे आहे. चेअरमन यांनी सुरूवाती पासुन गेटकेन उस गाळपास आणण्याचे ठरविले आहे. मग कारखाना सभासदांचा की गेटकेन धारकांचा? आत्ता तरी चेअरमन यांनी सभासदांच्या हिताचा निर्णय घ्यावा व सभासदांच्या सातव्या महिन्यातील
उसाचे गाळप केल्या शिवाय गेट केन उस गाळपास आणु नये.तसेच कारखान्याने सभासदांना दिपावली निमित्त देण्यात येणारी ३० किलो साखर बंद करून फक्त १० किलो साखर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी शेतकरी कृती समितीच्या वतीने चेअरमन व संचालक मंडळास आवाहन करण्यात येत आहे की, मागील वर्षी प्रमाणे यंदाही सभासदांना ३० किलो साखर दिपावली निमित्त देण्यात यावी. सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील अनेक कारखाने सभासदांना ८० ते १०० किलो
साखर २ रू ४रू. व ७ रू. या दरामध्ये देत आहेत. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखाना तर गेली अनेक वर्ष सभासदांना मोफत साखर वाटप करतो. तर मग आपल्याच कारखान्याने सभासदांची साखर बंद करण्याचा निर्णय का घेतला तरी नेअरमन व संचालक मंडळाने शेतकरी कृती समितीने केलेल्या दोन्ही मागण्यांचा सकारात्मक विचार करून दि. ३१ पर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात कळवावे. अन्यथा नाईलाजास्तव शेतकरी कृती समितीस मोर्चा काढावा लागेल व वेळ पडल्यास उपोषणही करावे लागेल तसेच या दरम्यान काही अनुचीत प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी चेअरमन व संचालक मंडळाची राहिल. याची नोंद घ्यावी असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसे पत्र
प्रतः- मा. साखर आयुक्त सो.
साखर संकुल शिवाजीनगर पुणे.
२. मा. प्रादेशिक सह संचालक (साखर)
पुणे विभाग पुणे.
चेअरमन म्हणतात ३० किलो साखर दिली तर त्याचा भावावर परिणाम होतो मग गेल्यावर्षी ३० किलो
साखर दिली त्यावेळी भावावर परिणाम झाला नव्हता का? कृष्णा साखर कारखाना गेली अनेक वर्ष मोफत साखर देतो व त्या भागातील इतर कारखाने ही २ रू. ४ रू. व ७ रू. किलो या दराने साखर देतात मग त्यांच्या भावावर त्यांचा परिणाम झाला नाही का? तरी चेअरमन यांनी कारणे न देता ३० किलो साखर दिपावली निमित्त यावी जरी त्याचा भावावर परिणाम होत असला तरी सभासद कारखान्याचा मालक आहे तुमच्या वैयक्तिक खाजगी मालकिचा नाही.
सतिशराव शिवाजीराव काकडे दे.
अध्यक्ष, पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती