बारामती ! सायबर जागरूकता काळाची गरज- आनंद भोईटे
बारामती:सायबर जागृती काळाची गरज असल्याचे प्रतिपादन बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी केले. विद्या प्रतिष्ठान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा' या उपक्रमा अंतर्गत आयोजित पथनाट्यप्रसंगी श्री. भोईटे बोलत होते. ऑक्टोबर महिना हा सायबर जागृती महिना म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने दि. १५ ओक्टोबे २०२३ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे भोईटे म्हणाले की पोलीस विभागसुद्धा वेळोवेळी सायबर जागृती करीत असतो तरीसुद्धा नागरिक याला बळी पडताना दिसतात. फसवणूक झाल्यानंतर शासनाने 1930 टोल फ्री नंबर प्रसिद्ध केला आहे, त्याचा वापर करावा, आर्थिक फसवणूक झाल्यानंतर आपल्या खात्यातून लगेच पैसे काढले जातात अशावेळी तात्काळ तक्रार केल्यास पैसे परत मिळण्यास मदत होते ,मात्र तास-दोन तासाने आल्यानंतर हाती काहीच मिळत नाही असेही ते म्हणाले. फसवणूक करणाऱ्याचे खूप मोठे रॅकेट असते ते पकडणे अवघड असते, पैसे मिळण्याचे प्रमाण पाच ते दहा टक्केच आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी 1930 या क्रमांकाचा वापर करावा. अशा प्रकारात शेतकरी फसत नाही तर शिक्षण घेतलेले सुशिक्षितच फसतात त्यामुळे शहरी भागातील नागरिकांनी जास्तीची जागरूकता बाळगली पाहिजे. यावेळी सादर केलेल्या पथनाट्याचे त्यांनी कौतुक केले.
सकाळी विद्या कॉर्नर, सीटिं इन चौक व सायंकाळी पाच वाजता रिलायन्स मॉल परिसरात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामध्ये बी. बी. ए. (सी. ए.) व बी.एस.सी. (कम्प्युटर सायन्स) या विभागातील साहिल तावरे,अब्दुल्ला तांबोळी,शिवानी छेडे, सागर मेरावी, सूर्यवंशी शिवराज,युवराज जगताप,अनुजा भोंगळे, अनिकेत फडतरे, स्वराज मालुसरे, सुजल जठर, ओंकार पवार, श्वेता खैरे, धनश्री नहाने, श्वेता शिंदे, सबनाज मुलानी, कसीरा झारी, , पवार ओमकार, देवकर प्रणाली,आदित्य खरात,विठ्ठल पाटील या २० सायबर योद्धा यांनी 'सायबर सुरक्षेचे जागर' हे पथनाट्य सादर केले. सध्याच्या मॉर्फिंग एडिटिंगमुळे आजचे युवक कसे फसवले जातात तसेच विविध प्रकारच्या सायबर हल्यांची माहिती व त्यावर काय काळजी घेतली पाहिजे हे या पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी सादर केले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ.श्यामराव घाडगे ,उपप्राचार्य डॉ.लालासाहेब काशीद , बी.बी.ए.-सी.ए विभाग प्रमुख महेश पवार बीएससी कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख गजानन जोशी, डॉ.सांगवीकर जगदीश , गौतम कुदळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाच्या माजी विध्यार्थी संघाचेही मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रमासाठी शिक्षक समन्वयक सलमा शेख तर विद्यार्थी प्रतिनिधी साहिल तावरे यांनी विशाल शिंदे, अनिल काळोखे, पुनम गुंजवटे, अक्षय भोसले, वैशाली पेंढारकर, अक्षय शिंदे, कांचन खिरे यांच्या मदतीने विशेष परिश्रम घेतले.