Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात 'दीनदयाळ उपाध्याय महारोजगार' मेळावा संपन्न.मेळाव्यामध्ये २३ उद्योजक आले तर ६३२ उमेदवारांची नोंदणी झाली ... ३३४ बेरोजगार उमेदवारांची निवड

सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात 'दीनदयाळ उपाध्याय महारोजगार' मेळावा संपन्न.
मेळाव्यामध्ये २३ उद्योजक आले तर ६३२ उमेदवारांची नोंदणी झाली ... ३३४ बेरोजगार उमेदवारांची निवड 



सोमेश्वरनगर- महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मु. सा. काकडे महाविद्यालय व विप्रा स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार' मेळावा संपन्न झाला पुणे जिल्ह्यातील उद्योजकांशी समन्वय साधून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बारामतीतील  सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयात शुक्रवार दि १३ रोजी सदर महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.डॉ. अनिल बागल गटविकास अधिकारी, बारामती हे होते, तर  समारंभाचे अध्यक्ष अभिजीत काकडे- देशमुख महाविद्यालय विकास समिती - अध्यक्ष हे होते. यावेळी  सचिन जाधव सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व  सचिन जाधव विप्रा स्किल इंडिया प्रा. लिमिटेड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे व संस्थेचे सचिव सतीशराव लकडे उपस्थित होते.
             यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अनिल बागल यांनी 'प्रत्येकाचे जीवनात काहीतरी ध्येय ठरलेले असते. आणि त्यानुसार आपण शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर त्या पात्रतेच्या अनुषंगाने सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक, स्थैर्य प्राप्त करण्यासाठी उद्योग व कमावण्याचं साधन निर्माण करणे आवश्यक आहे, आणि ते साधन तुमच्या कौशल्यातून निर्माण झाले पाहिजे. तसेच अनेकांपर्यंत नोकरीची माहिती व संधी पोहचत नाही म्हणून शासनाने एक धोरण ठरवले व कौशल्य विकास उद्योजक विभागाच्या माध्यमातून मेळावा घेऊन विविध कंपनीच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून प्रत्येकाच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देणे हा त्या पाठीमागचा उद्देश आहे म्हणून या मेळाव्याच्या आयोजन केलेले आहे' असे विचार त्यांनी मांडले.    
        तसेच सचिन जाधव यांनी पुणे जिल्ह्यातील नामांकित कंपनीचे इथे प्रतिनिधी उपस्थित आहेत ही तुम्हाला मिळालेली संधी आहे, त्या संधीचा उपयोग करून घ्यावा असे आव्हान केले. तसेच नोकरी पाहिजे म्हटल्यावर मुलाखत देणे आवश्यक असते व पगाराचे अपेक्षा न ठेवता जिथे नोकरी मिळेल तो अनुभव घेणे महत्त्वाचे आहे, आणि त्या अनुभवाच्या जोरावर पुढे एक एक शिखर पदाक्रांत करणे आवश्यक आहे. आणि कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टी पासूनच होत असते, आणि छोट्या गोष्टी पासून पुढे उद्योजकापर्यंत पोहोचता येते असे विचार त्यांनी मांडले.
         यावेळी  चव्हाण यांनी 'कौशल्य विकास हा विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे कारण चीन, जपान, जर्मनी या देशाची जी प्रगती झाली आहे त्याचे मुख्य कारण तेथे कौशल्य विकासाला फार महत्त्व दिले गेले आहे तेथील छोटी छोटी मुले सुद्धा घड्याळे, स्मार्ट वॉच तयार करतात त्यांना लहानपणापासून कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाते' हा विचार त्यांनी मांडला. तसेच प्रत्येकाने आपले ध्येय एकदा निश्चित करा मला काय बनायचे आहे, आणि तसा प्रयत्न करा निश्चित त्या देहापर्यंत तुम्ही पोहोचाल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.            
   यावेळी या समारंभाचे अध्यक्ष अभिजीत  काकडे देशमुख यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे  यांनी केले. यावेळी पुणे जिल्ह्यातील जवळपास २३ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
           सदर मेळाव्यामध्ये २३ उद्योजकांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्यामध्ये ६३२ उमेदवारांची नोंदणी झाली व त्यापैकी ३३४ बेरोजगार उमेदवारांची उद्योजकांनी निवड केली.
          या महारोजगार मेळाव्याचे नियोजन समन्वयक डॉ. नारायण राजुरावार यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अच्युत शिंदे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test