Type Here to Get Search Results !

सोमेश्वरच्या सभासदांची २० किलो साखर कमी केल्यामुळे सभासदांमध्ये मोठा असंतोष- सतिशराव काकडे

सोमेश्वरच्या सभासदांची २० किलो साखर कमी केल्यामुळे सभासदांमध्ये मोठा असंतोष- सतिशराव काकडे
दिपावली निमित्त तात्काळ ३० किलो साखर देण्याचे परिपत्रक काढावे.


सोमेश्वरनगर  - बारामती तालुक्यातील 
सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांची २० किलो साखर कमी केल्यामुळे सभासदांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यावर चेअरमन यांनी वर्तमान पत्रामध्ये जो खुलासा केला आहे. तो हास्यास्पद व पोरकटपणाचा आहे. सोमेश्वर कारखाना सभासदांना शेअर्सच्या मिळणाऱ्या साखरे व्यतिरिक्त दिपावली निमीत्त ३० किलो जादा साखर देत होता. परंतु इन्कमटॅक्सचे कारण देत टनाला २५ रू नुकसान होत आहे.त्यामुळे चालु वर्षी पासुन
सभसदांची दिपावली सणाची २० किलो साखर सभासदांच्या मुलाबाळांच्या तोंडातुन काढुन घेतली. वास्तविक मागील वर्षी ३० किलो साखर देत असताना इन्कमटॅक्स नव्हता का? जर इन्कमटॅक्सची एवढी भीती होती तर चालु आर्थिक पत्रकात ठेव विमोचन निधी १५ कोटी रूपये नफ्यातुन काढुन घेत असताना सभासदांच्या माथी १ कोटी ५८ लाख रूपये इन्कमटॅक्स गरज नसताना का भरला त्यावेळी सभासदांचा कळवळा का नाही आला. सभासदांचे टनाला १२ ते १३ रूपये नुकसान तुम्ही का केले? याचा चेअरमन यांनी पहिल्यांदा खुलासा करावा. कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासदांच्या प्रेमा पोटी गेली कित्येक वर्ष दरमहा ५ किलो साखर मोफत देत आलेला आहे. हे जर का खोटे असेल तर चेअरमन यांनी सिध्द करावे?
मागील काही वर्षांपर्यंत सभासदांना प्रती शेअर्स प्रमाणे ५ किलो साखर मिळत असताना चेअरमन यांनी जाणीव पर्युक ती बंद करून प्रती सभासद ५ किलो साखर सुरू केली मात्र ज्या जुन्या संस्थापक सभासदांचे जादा शेअर्स होते. त्या ६७०० शेअर्स धारकांची साखर बंद करून त्यांच्यावर अन्याय का केला. आत्ता मात्र वाढीव भागभांडवल पाहिजे होते म्हणुन ज्यादा वाढीव शेअर्स ला शेअर्स प्रमाणे साखर देवु असे अमिष दाखविले व दुसरीकडे मात्र सभासदांना दिपावली निमित्त देण्यात येणारी २० किलो साखर कमी केली यावरून चेअरमन यांना सभासदांचा किती कळवळा आहे हे दिसते. दुसरीकडे मात्र आजी माजी संचालकांना
सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व लग्न समारंभासाठी दर वर्षी १०० किलो साखर देत आहात त्यावेळी सभासदांचे हित दिसले नाही का? तरी सोमेश्वर कारखान्याच्या एकुण सभासद संख्येमध्ये एक शेअर्स धारण केलेल्या सभासदांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे दिपावलीची ३० किलो साखर सभासदांना मिळालीच पाहिजे, अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे. तसेच चेअरमन हे वारंवार इन्कमटॅक्सचे भुत उभे करून सभासदांना भिती दाखवत आहेत वास्तविक ज्यावेळी को-जन उभा केला त्यावेळी कोट्यावधी रूपये इन्कमटॅक्स कर माफी मिळाली. आज आपण पुन्हा
३६ मेगावॅट को-जन निर्मिती करून पुन्हा पुढील काही वर्ष करमाफी कारखान्यास मिळणारच आहे. तरी चेअरमन सोयी प्रमाणे सभासदांची दिशाभुल का करीत आहेत? खरे सांगायचे म्हटले तर माळेगावचा चेअरमन बदलल्यामुळे सोमेश्वरचा चेअरमन बदलणे क्रमप्राप्त आहे त्यामुळे चेअरमन हा राग सभासदांवर तर काढत नाहीत ना? तरी चेअरमन यांना कृती समिती विनंती करीत आहे की किमान घरी जाता जाता खोटे बोलुन सभासदांची दिशाभुल करणे थांबवावे व दिपावलीची ३० किलो साखर सभासदांना देण्याची परंपरा चालु ठेवावी की जेणे करून भविष्यात चेअरमन जाता जाता एक चांगली गोष्ट करून गेले असे सभासद
म्हणतील. तरी वरील सर्व बाबींचा विचार करता सभासदांना तात्काळ ३० किलो साखर पुर्वरत सुरू करावी.तसेच संचालक मंडळाला कृती समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की वरील बाबींचा
गांभिर्याने विचार करून त्याबाबत खुली चर्चा करण्यासाठी वर्तमान पत्रामधुन सर्व सभासदांना बोलविण्यात यावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच दिपावलीची साखर कमी केले बाबतचा सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय मी अजितदादांच्या कानावरही घालणार आहे. तसेच साखरेचा विषय सभासदांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने चेअरमन यांनी उडवा उडवीची उत्तरे न देता दिपावली निमित्त तात्काळ ३० किलो साखर देण्याचे परिपत्रक काढावे. तसेच सोमेश्वर कारखाना हा सभासदांचा कारखाना आहे. वैयक्तिक मालकीचा नाही याचे भान ठेवावे.
 सतिशराव शिवाजीराव काकडे
अध्यक्ष, शेतकरी कृती समिती सोमेश्वरनगर


१) कृष्णा सहकारी साखर कारखाना कराड सभासदांना प्रती शेअर्स, दर महिना ५ किलो साखर मोफत देतो म्हणजे दरवर्षी
६० किलो साखर मोफत देतो.
२) राजाराम सहकारी साखर कारखाना कोल्हापुर सभासदांना दर महिना ७ किलो साखर २ रूपये प्रती किलो प्रमाणे तसेच
दिपावली निमित्त ७ किलो साखर २ रुपये प्रती किलो प्रमाणे देतो म्हणजे दरवर्षी ९१ किलो साखर २ रुपये प्रती किलो
प्रमाणे देतो.
३) हुतात्मा सहकारी साखर कारखाना वाळवा हा कारखाना सभासदांना प्रती शेअर्स दर महिना १५ किलो साखर ४ रू.
दराने देतो व दिपावली निमित्त १० किलो साखरही देण्यात येते.
४) दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ हा कारखाना सभासदांना प्रती शेअर्स दरवर्षी १०० किलो साखर १० रू. दराने
देतो.
वरील सर्व कारखाने हे भारतातीलव असुन शेजारील जिल्ह्यातील आहेत त्यांना सुध्दा इन्कमटॅक्सचा कायदा आहे.
तरी सभासदांनो जागे व्हा आणि या वेअरमनवा सभासदांच्या विषयी असणारा कळवळा पहा
पत्रांमधुन माळेगाव कारखान्याच्या प्रती शेअर्स देण्यात येणाऱ्या साखरे बाबत सोयीप्रमाणे सोमेश्वरची
तुलना करतात. दुसरीकडे मात्र माळेगाव कारखान्याने केलेल्या साखर पोत्यांच्या मुल्यांकनाप्रमाणे सोमेश्वरचे चेअरमन
मुल्यांकन का करीत नाहीत. मग सोमेश्वर कारखान्याने सुध्दा माळेगाव कारखान्याच्या मुल्यांकनाप्रमाणे शिल्लक साखरेचे
मुल्यांकन करून १२०/- रू. प्रती मेटन अधिकचा दर सभासदांना दयावा व वेअरमन यांनी दोन्ही बाजुनी ढोलकी वाजविणे बंद करावे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test