मानव अधिकार संरक्षण समिती च्या पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी राजेंद्र भिसे
बारामती - मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी या पदावर मुरूम(ता बारामती) राजेंद्र गोपाळ भिसे यांची महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याचे पाहून भगवान भाई दाटिया (राष्ट्रीय अध्यक्ष )यांच्या सूचनेनुसार व जि. एम. भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष नागेश कालिदास जाधव यांच्या शिफारशीवरून मुरूम येथील राजेंद्र भिसे यांची पुणे जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल विविध क्षेत्रातून राजेंद्र भिसे यांचे अभिनंदन होत आहे. या निवडीबद्दल आपणावर टाकलेला विश्वास मी सार्थक करेन असे नवनिर्वाचित राजेंद्र भिसे यांनी बोलताना म्हणाले.