Crime new महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील मयत सुवर्णा दशरथ ठोंबरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आनंद पोपटराव देवकाते रा.सोनगांव ता.बारामती जि.पुणे यांनी माझी बहिण सुवर्णा दशरथ ठोंबरे हिला वारवांर दारू पिऊन शारीरिक व मानसिक त्रास देवुन मारहाण करत असल्याने तीने या त्रासाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली,
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी डॉक्टर पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ बाजीराव ठोंबरे रा.वडगाव ता.बारामती जि.पुणे. बाजीराव बापु ठोंबरे.रंजना बाजीराव ठोंबरे दोन्ही रा.सस्तेवाडी ता.बारामती जि.पुणे. दयाराम बापुराव कोळेकर रा.कोळेकरवस्ती,झारगडवाडी ता.बारामती जि.पुणे.करीना बागवान (पुर्ण नांव माहीत नाही.)रा.वडगांव निंबाळकर ता.बारामती जि.पुणे व राजेंद्र तुकाराम होळकर रा.सस्तेवाडी ता.बारामती जि.पुणे यांचेवर वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये भा.द वि कलम 306,323,504,506,34 नुसार गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना करण्यात आला. पुढील तपास वडगांव निंबाळकर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई योगेश शेलार.हे करीत आहेत. अशी माहिती वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन कडून देण्यात आली आहे.