Crime news महिलेला खोटी फिर्याद देणे पडले महागात; फिर्यादी यांना न्यायालयाकडून दंड
बारामती - बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे खोटया फिर्यादी देणार महीला फिर्यादी यांना न्यायालयाकडून ५ हजार रूपये दंड
मिळालेल्या माहितीनुसार दि. १२/०८/२०२३ रोजी फिर्यादी अ ब क यांनी त्यांना आरोपीने लग्नाचे अमीश दाखवून लैंगीक
अत्याचार केलेबाबत व दि २४/०८/२०२३ रोजी फिर्यादी यांना आरोपीने मारहाण करून लैंगीक अत्याचार केलेबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तकार दिल्याने गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील फिर्यादी
यांनी दिलेली फिर्याद हया महीलांसंबंधीत गंभिर अपराधाच्या असल्याने यातील आरोपींना पोलीसांनी तात्काळ अटक केली होती. दोन्ही गुन्हयातील आरोपीत यांनी मा. अति सत्र न्यायालयात बारामती येथे जामीन अर्ज दाखल केले असता
यातील फिर्यादी यांनी मा न्यायालयात प्रतिज्ञापत्राव्दारे रागाच्या भरात गैरसमजुतीने तकार दिलेबाबत कळविले. यातील तपासी अधिकारी यांनी दाखल केलेले म्हणणे तपासाची कागदपत्रे व फिर्यादी यांचे लेखी प्रतिज्ञापत्रावरून मा अति. सत्र
न्यायाधीश बारामती यांनी दोन्ही फिर्यादी यांना त्यांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला म्हणून ५००० रूपये दंड पोलीस कल्याण निधी मध्ये जमा करण्याचा आदेश दिला आहे. वर नमुद दोन्ही गुन्हयांचा तपास मा. उपविभागीय पोलीस
अधिकारी गणेश इंगळे सो मा पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे सो यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि राहुल घुगे यांनी केला आहे. सदर जामीन अर्ज सुनावणीवेळी सरकारी वकील म्हणून ज्ञानदेव शिंगाडे व कोर्ट अंमलदार म्हणून पो हवा अभिमन्यू कवडे यांनी काम पाहीले आहे.