Crime News सुपा पोलीसानी अवैध कतलीसाठी नेणाऱ्या जनावरांनाचे वाचवले प्राण.
बारामती - बारामती तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 14/09/2023 रोजी रात्रगस्त करिता रवाना झालेले सुपा पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक/862 डी. डी. धुमाळ, पोलीस अमलदार/2863 के. व्हीं. ताडगे असे मिळून सुपा ते लोणी पाटी या रोडने गस्त घालत असताना पहाटे 02/45 वाजताच्या दरम्यान बाबुर्डी गावच्या हद्दीत कऱ्हा नदीच्या पुलाजवळ दोन संशयित पिकप उभे असलेले मिळून आले. पिकप नंबर MH 42 AQ 0292 व MH 12 SF 5028 याची जवळ जाऊन पाहणी केली असता,MH 42 AQ 0292 यामध्ये 20 जर्सी गाईचे वासरे व MH 12 SF 5028 यामध्ये 25 जर्सी गायचे वासरे दोन्ही पिकप मध्ये असे एकूण मिळून 45 जर्सी गाईचे वासरे निर्दयतेने कोंबून ठेवलेले मिळून आले. याबाबत सदर पिकप मधील संशयित इसम व चालक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे जर्सी गाय वासरे हे अवैद्य कतली करता घेऊन जात आहे असे सांगितले. तसेच यातील आणखी काही जनावरे मौजा लोणी भापकर तालुका बारामती जिल्हा पुणे येथील इसम नामे मोहम्मद गुलाब तांबोळी राहणार लोणी भापकर तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्या गोठ्यामध्ये डांबून ठेवले आहेत असे सांगितले. सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना देऊन त्यानंतर सुपा पोलीस स्टेशन टीम यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे व त्यांची टीम यांना फोन दारे संपर्क करून लोणी भापकर येथील गोट्यांमध्ये क्रूर पद्धतीने डांबून ठेवलेले 14 जर्सी गाई व कालवड असे जनावरे ताब्यात घेतली. सदर कारवाई मध्ये एकूण 7,55,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यातील इसम नामे 1. राजा हुसेन शेख, 2. अमर हाजी शेख,3. हुसेन इमाम शेख, वरील तिन्ही राहणार निरावागज तालुका बारामती जिल्हा पुणे,4. कौसीन जमील कुरेशी,5. आरिफ राजू कुरेशी वरील दोन्ही राहणार पंजाब वस्ताद चौक, करमाळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, 6. मोहम्मद गुलाब तांबोळी, राहणार लोणी भापकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे असे 06 इसमा वरती सुपा पोलीस स्टेशन येथे प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे , उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहाय्यक फौजदार जाधव, वाघोले, साळुंखे, पोलीस नाईक धुमाळ,पोलीस शिपाई जावीर, ताडगे,दरेकर, साळुंखे यांनी मिळून केली.