लोणीभापकर येथे श्रमदानातून वनराई बंधारा
लोणी भापकर:- लोणी भापकर ( ता.बारामती) येथे
महाराष्ट्र शासन बारामती तालुका कृषी विभाग सुपा मंडल
आणि लोणी भापकर स्वच्छता अभियान ग्रुप यांच्या समन्वयाने लोणी भापकर येथील श्री दत्त मंदिरा शेजारील ओढा या ठिकाणी श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे काम करण्यात आले. श्रमदानासाठी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सौ. सुप्रिया बांदल मॅडम. मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ साहेब सुपरवायझर श्री लोधाडे बापू. कृषी सहाय्यक श्री स्वप्निल गायकवाड मा.सरपंच व ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भापकर,विजयसिंह भापकर व स्वच्छता अभियान ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते