सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात स्वच्छता पंधरावडा व सेल्फी अपलोड कार्यक्रम संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालय येथे केंद्र सरकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार एक सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या स्वच्छता पंधराव्या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक १ सप्टेंबर२०२३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्यानंतर या पंधरा दिवसांमध्ये महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना आणि ग्रामपंचायत वाघवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी महाविद्यालयातून महास्वच्छता अभियानाची भव्य रॅली महाविद्यालय ते वाघळवाडी या दरम्यान आयोजित करण्यात आली.
वाघवाडी च्या अंबामाता मंदिरामध्ये वाघळवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अॅड. हेमंत जी गायकवाड यांच्या शुभहस्ते महास्वच्छता अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच माननीय श्री गणेश जी जाधव ग्रामविकास अधिकारी संजय भोसले ग्रामपंचायत सदस्य आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .देविदास वायदंडे सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि निर्देशानुसार या कार्यक्रमाचे समन्वयक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक प्रा अच्युत शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत वाघळवाडी ग्रामपंचायतीची संपूर्ण स्वच्छता, ग्राम स्वच्छता ,रस्ते स्वच्छता, त्याचबरोबर हातामध्ये माती घेऊन त्याचा सेल्फी फोटो काढून अपलोड कार्यक्रम करण्यात आला.
ग्रामविकासासाठी महाविद्यालयीन सळसळणाऱ्या रक्ताच्या तरुणांनी ग्रामविकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ग्राम स्वच्छता, ग्रामविकास या कार्यक्रमांचा ध्यास घेतला पाहिजे असे वक्तव्य ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंतजी गायकवाड यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आणि महाविद्यालयाच्या वतीने उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी जेष्ठ प्राध्यापक डॉ. जवाहर चौधरी सर, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट डॉ श्रीकांत घाडगे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डाॅ. दत्तात्रय दुबळे सर
प्रा. मेघा जगताप प्रा. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ .राहुल खरात सर डॉ. निलेश आढाव प्रा. नामदेव जाधव सर, प्रा. संतोष शेळके सर, प्रा. गोरख काळे सर प्रा. उमेश जाधव सर त्याचबरोबर प्रा रूपाली हाके, प्रा. शिल्पा कांबळे प्रा. डॉ कल्याणी जगताप प्रा. मेघा काकडे प्रा. प्राजक्ता शिंदे प्रा. प्रगती गुरव हे सर्वजण उपस्थित होते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे, विद्यार्थी विकास मंडळाचे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री सकुंडे यांनी मानले