जालना जिल्ह्यातील मराठा समाजावरील अमानुष कृतीचा निषेध
दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम
दाैंड - जालना जिल्ह्यातील सराटी येथील मराठा आंदाेलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आल्या प्रकरणी
अखिल भारतीय मराठा महासंघ, दाैंड शहर व तालुक्याच्या वतीने दाैंड पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक व दाैंडचे तहसीलदार यांना ६१ सह्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनानुसार जालना जिल्ह्यातील मराठा समाजाच्या आंदाेलकांवर अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी महिला, तरुण वर्ग, व सकल मराठा समाजाच्या आंदाेलकांवर केलेल्या लाठीचार्ज व गाेळीबाराचा आदेश देणा-या अधिका-यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे. मराठा समाजाला न्याय द्यावा. अन्यथा दाैंड तालुक्यातील मराठा महासंघाच्या वतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला दिलेला आहे.
यावेळी उमेश वीर, गणेश जगदाळे, नंदू जगताप, दिनेश पहाटे, सुनिल जगदाळे, नंदू पवार, मधुकर जठार, प्रमाेद खांगल,अविनाश गाठे,दादा नांदखिले, याेगेश कराळे व माेठ्या संख्येने मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित हाेते.