बारामती ! महिला रुग्णालय येथे 'आयुष्मान भव:' मोहिमेचा शुभारंभ
बारामती : रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या स्नेहल भापकर यांच्या हस्ते महिला रुग्णालय येथे 'आयुष्मान भव:' या मोहिमेचे शुभारंभ करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी हेमंत नाझीरकर, राहुल वाघमारे, विजय पाटील, डॉ. वैशाली सातपुते, डॉ. महेंद्र आटपाळकर आदी उपस्थित होते.
या मोहिमेअंतर्गत महिला रुग्णालय येथे दर शुक्रवारी 'आरोग्य मेळा' आयोजित करण्यात येत असून यामध्ये आभा कार्ड काढणे, गोल्डन कार्ड काढणे, गरोदर मातांची तपासणी व लसीकरण, लहान मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच कुपोषित बालक, मोतीबिंदू , तोंडाचा कर्करोग, असंसर्गजन्य आजार( उच्च रक्तदाब, मधुमेह), स्त्रियांसाठी स्तनांचा व गर्भाशयाचा कर्करोगाची तपासणी करण्यात येत आहे. आयुष विभागाकडूनही रुग्णांची तपासणी व उपचार देण्यात येत असून सर्व उपलब्ध औषधोपचार व तपासणी मोफत करण्यात येत आहे.
यावेळी कर्मचाऱ्यांना 'आयुष्मान भव:' या मोहिमेची माहिती तसेच अवयव दान प्रतिज्ञा देण्यात आली.
सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी व उपचार आणि आवश्यक त्या संदर्भ सेवा १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. अशी माहिती महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई यांनी दिली आहे.