मातीच्या गोळ्यापासून श्रीगणेशाची मूर्ती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
सोमेश्वरनगर - ज्ञानसागरात पोहणारा राजहंस म्हणजे विद्यार्थी या सुविचाराच्या अर्थबोधाप्रमाणे सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ(विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वरनगर ता बारामती) या प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन मिळत असते. ही शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी आहे. मातीच्या गोळ्यापासून आपल्या हातांच्या कुंचल्यांच्या माध्यमातून कलात्मक श्री. गणेशाची मूर्ती तयार करण्याची प्रेरणा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका- आदरणीय धुमाळ मॅडम यांचे मनःपूर्वक अभिनंदन! प्रशालेचे आदरणीय प्राचार्य पी.बी.जगताप सर, पर्यवेक्षक -श्रीमती विजया शिर्के मॅडम, ज्येष्ठ शिक्षक आदरणीय .राजेंद्र नलवडे सर, क्रीडा शिक्षक. वाडकर सर . युवराज शिंदे सर, कोळेकर सर, प्रशालेत समर्पण व सेवा वृत्तीने धडपडणारे सेवक. सुनील पाटोळे मामा व सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू ,भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांनी या गुणी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली. शब्दांकन-प्रा. हनुमंत विठ्ठलराव माने सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय सोमेश्वरनगर
मातीच्या गोळ्यापासून श्रीगणेशाची मूर्ती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.
September 30, 2023
0
Tags