सोमेश्वरनगर ! काकडे महाविद्यालयात 'मेरी माटी मेरा देश अभियान' चे आयोजन
सोमेश्वरनगर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ आणि ग्रामपंचायत वाघळवाडी व सैनिक कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश अभियान' या उपक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.
या अभियानासाठी प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू मा. डॉ. पराग काळकर व या अभियानाचे प्रमुख संयोजक तथा महाराष्ट्र राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेशजी पांडे व महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीशराव काकडे- देशमुख, प्रसिद्ध उद्योजक आर. एन. (बापू) शिंदे व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे- देशमुख उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी दिली.
या अभियानासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयावर आयोजनाची जबाबदारी दिली आहे. यासाठी बारामती तालुक्यातील सर्व विद्यापीठ संलग्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या अभियान उपक्रमासाठी बारामती तालुक्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.