बारामती ! सीमेवर रक्षण करणाऱ्या (फौजी) जवानांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी "शिव आरोग्य सेना" सज्ज : डॉ.किशोर ठाणेकर
बारामती - शिव आरोग्य सेना कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर,राज्य उपाध्यक्ष डॉ.जयवंत गाडे तसेच राज्य मुख्य समन्वयक जितेंद्र दगडू सकपाळ यांच्या संकल्पनेतून देशाच्या सैनिकांची आरोग्य सेवा करण्याबाबत अभियान ची माहिती देण्यात आली.
देशाच्या सीमेवर तैनात जवान (फौजी) हे देशाचे रक्षण करीत असतात. आणि त्या जवानांच्या कुटुंबियांच्या मेडिकल इमर्जन्सी, दवाखान्याच्या सुविधा किंवा आरोग्याची काळजी घेण्यासाठी शिव आरोग्य सेना सज्ज आहे असे प्रतिपादन "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" पक्षाशी सलंग्न असलेल्या शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांनी केले. तालुकानिहाय जवानांच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्यांना मेडिकल सुविधा साठी मदत करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिव आरोग्य सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक दिपक खरात गुरुजी यांनी बारामती येथे पदाधिकारी मीटिंग चे आयोजन केलेले होते त्यावेळी डॉ.ठाणेकर यांनी गुगल मिट द्वारे ऑनलाईन मार्गदर्शन केले.
यावेळी शिव आरोग्य सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक दिपक खरात गुरूजी, जिल्हा सहसमनव्यक हनुमंत खामगळ, जिल्हा सचिव दिलीप नाळे, इंदापूर तालुका समन्वयक सचिव सचिन नरुटे, बारामती शहर समन्वयक मोतजमिन झैदी, सुनील पवार, मयूर थोरात इत्यादी उपस्थित होते. तर ऑनलाईन पद्धतीने पुणे (शहर) जिल्हा समन्वयक रमेश क्षीरसागर, इंदापूर तालुका समन्वयक अनिल पाटील व तालुका संघटक राजेंद्र दिवार उपस्थित होते.