लोणी भापकर ग्रामपंचायत च्या उपसरपंचपदी उज्वला कडाळे यांची निवड
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील लोणी भापकर
येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी उज्वला प्रकाश कडाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडप्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच गीतांजली भापकर या होत्या. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी उज्वला शिंगाडे यांनी काम पाहिले.माजी उपसरपंच नंदकुमार मदने यांनी आपला कार्यकाळ संपताच उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी निवडणूक घेण्यात आली.
याप्रसंगी माजी सरपंच व विद्ममान सदस्य रवींद्र भापकर , माजी उपसरपंच नंदकुमार मदने ,ग्रामपंचायत सदस्या कविता आरडे ,स्वाती बनसोडे, आशा भापकर ,सौरभ गोलांडे ,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप जगदाळे, निरा मार्केट कमिटीचे माजी संचालक सुरेश मदने ,बाबा कुंभार व दादा कडाळे, बबन कडाळे उपस्थित होते.