बारामतीतील देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बॅडमिंटन आणि तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश..
बारामती - म.ए.सो. हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बॅडमिंटन आणि तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश मंगळवार दि. २६ रोजी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल खेड येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरीभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमधील १७ वर्ष वयोगटात कु.भाग्यश्री नितीन गांगुर्डे हिने उत्तम कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच तिची विभागीय स्तरावर निवड झाली.या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक.अमित गावडे यांनी मार्गदर्शन केले.
इयत्ता ४ थी तील विद्यार्थी चि. वरद चितळे याने ११ वर्ष वयोगटात पुणे येथे झालेल्या एकेरी बॅटलडोर बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, महामात्र मा.डॉ.श्री. गोविंद कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.