शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ "सोमेश्वर" येथे सोमवारी बंदची हाक.
सोमेश्वरनगर - जालना जिल्ह्यातील अंरतवली या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठी चार्ज केला होता या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटले असतानाच बारामती शहरासह तालुक्यातील वडगाव निंबाळकर कोराळे बुद्रुक चौधरवाडी सह सोमेश्वरनगर करंजेपुल या ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी व्यापार पेठ व गाव बंद ठेवत निषेध म्हणून तीव्रस्वरूपात आंदोलन सोमवारी दि ४ रोजी पाहावयास मिळाले
या अनुषंगाने मराठा आरक्षण आंदोलनास व बारामती बंदला पाठींबा देण्यासाठी सोमेश्वर पंचक्रोशीतील वाड्यावस्तीवरील तरूण व ज्येष्ठ नागरिक एकत्र येत सोमवारी दि ४ रोजी सकाळी करंजेपुल येथील मुख्य चौकामध्ये सर्व युवक जेष्ठ जमा झाले होते. करंजेपुल सह करंजे, मगरवाडी, सोरटेवाडी, वाणेवाडी, निंबुत, मुरूम,चौधरवाडी, ये दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या दरम्यान करंजेपूल-सोमेश्वरनगर मुख्य चौक ते सोमेश्वर कारखान्यापर्यंत रॅली काढून तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार करत पूजन केले तसेच करंजेपूल चौकात पर्यंत पुन्हा रॅली आली. नीरा-बारामती रस्त्यावर बसत मराठा आरक्षण व अमानुष लाठी चार्ज यांचा जाहीर निषेध व्यक्त करत बारामती बंदला पाठींबा देण्यात आला.
सोमेश्वरचे संचालक ऋषीकेश गायकवाड यांनी, लाठीमार प्रकरणाचा जाहीर निषेध व्यक्त करत झालेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून मराठा समाजाला न्याय संबंधीत प्रशासनाने द्यावा.
यावेळी 'सोमेश्वर'चे माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, माजी संचालक विशाल गायकवाड,उद्योजक संतोष कोंढाळकर, माजी सरपंच वैभव गायकवाड,माजी उपसरपंच निलेश गायकवाड,निरा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बाळासाहेब शिंदे,इंजिनिर बाळासाहेब गायकवाड, मुरूमचे माजी सरपंच प्रदीप कणसे, शिवसेना विभागीय अध्यक्ष बंटी गायकवाड, भाजपचे तालुका सचिव हनुमंत शेंडकर, सोमेश्वरनगर चे भाजपा अध्यक्ष सुधीर गायकवाड, करंजेपुल माजी तंटामुक्ती अध्यक्ष नाना गायकवाडसामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर,निखिल शेंडकर,भाऊसाहेब हुंबरे, सुहास गायकवाड सोरटेवाडी माजी सरपंच दत्तात्रय शेंडकर, सदस्य नवनाथ शेंडकर सह आदि मान्यवरउपस्थित होते.
याप्रसंगी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे व उपनिरीक्षक योगेश शेलार यांना आंदोलकांनी निवेदन दिले.