सोमेश्वरनगर ! प्रा.डॉ.प्रवीण ताटे देशमुख यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेवराव काकडे महाविद्यालयातील उपप्राचार्य डाॅ. प्रवीण ताटे देशमुख यांची हिंगोली येथील समृद्धी प्रकाशनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ' स्व.मारोतराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 ' साठी निवड झाल्याचे पत्र पुरस्काराचे संयोजक प्रा.डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी दिले आहे. पुरस्काराचे वितरण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
डॉ.ताटे देशमुख हे महाविद्यालयात गेली १४ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मधून प्रकाशित झाले आहेत. 'विषवृक्षाच्या मुळ्या : एक आकलन ' हा समिक्षात्मक ग्रंथ त्यांच्या नावावर आहे. पुणे जिल्हा प्राध्यापक संघटनेचे ( स्पुक्टो ) सरचिटणीस म्हणूनही ते काम पाहतात. नव्या पिढीतील अभ्यासक, उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आढावा घेऊन राष्ट्रीय पातळीवरील नामांकित पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे देशमुख , अभिजित काकडे देशमुख , सचिव सतीश लकडे , प्राचार्य डाॅ. देविदिस वायदंडे , सर्व संचालक, प्राध्यापक व सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.