माहेरावरील प्रेमाच्या ओढीने गौराई आली; पारंपरिक गाणी गात आगमन..
पावसाचे आगमन झाल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच गौराई देखावे व हळदीकुंकू
सोमेश्वरनगर - गणोशोत्सवात गौरी पुजनालाही तितकेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वतीचे गौरी हे रुप आहे. वर्षातून दोन दिवस गौरी माहेरी राहण्यासाठी येते अशी मानले जाते. बुधवार रोजी दुपारपासुनच महिलांनी गौरी आणल्या व त्याचे विधिवत पुजन सुरू केले, माहेरावरील प्रेमाच्या ओढीने गौराई आली; पारंपरिक गाणी गात आगमन...विवाहीत महिला आपल्या सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी आणि कुमारीका आपल्याला चांगले सौभाग्य मिळावे यासाठी गौरी पुजा व्रत करतात. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरात गौरी आवाहन करुन गौरी आणल्या तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे सुंदर साडी, चोळीने सजवुन त्यांची पुजा व आराधना केली जाते.शुक्रवार रोजी गौरी पुजनात गौरीला गोडा- तिखटाचा नैवेद्य केला जातो.तर सामाजिक संदेश देणारे विविध देखावे ही काही कुटूंबे हौसेने मांडत असतात..हे दोन दिवस गौराईला गणेशाच्या शेजारी पुजनाचा मान मिळतो. गणपतीसोबतच गौराईची आरती, विविध गीते, गाणी म्हटली जातात. आणि या सगळ्यात महीलाच पुढाकार घेवून गौराईची आराधना करतात.तर सायंकाळी सर्व महिला एक मेकींच्या घरी जात गौरी गणपती दर्शन घेत हळदी कुंकवाचा मान मानाची देवाणघेवाण करीत असतात.
ग्रामीण भागासह शहरी भागात या सणाची पंरपरा जपली जात आहे हेच या उत्सवाचे महत्व आहे.