सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठानच्या तनुष्काची जुदो च्या विभागीय स्पर्धेसाठी निवड.
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी तनुष्का शिवाजी भुजबळ हिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक २७/०९/२०२३ रोजी बारामती येथे घेण्यात आलेल्या पुणे जिल्हा शालेय स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील व ४४ किलो वजन गटात खालील विभागामधून तनुष्काने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत बारामती परिसरातील ९ जिल्हा पातळीवरील स्पर्धक सहभागी झाले होते.शाळेतील क्रीडाशिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांचे तनुष्काला बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी तनुष्काचे व तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.