गणपती बप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणेश विसर्जन...
सोमेश्वरनगर - दहा दिवस वातावरणात चैतन्य आणलेल्या गणरायाला निरोप देण्याची वेळ गुरुवारी (ता. २८) अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन हे घरगुती असो वा गणेश मंडळ मिरवणूक ही दिमाखात आणि वैभवशाली पद्धतीने काढण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो.. बारामती तील सोमेश्वर-करंजे गावातील दरवर्षी प्रमाणे एकत्र विसर्जनासाठी गणेश मूर्ती नेण्यासाठी हातगाडीला सजवत व तो रथ आकर्षक करत गणपतीचा जयघोष ,टाळ ,घंटी तसेच गणपती बप्पा मोरया ...मंगलमूर्ती मोरया... पुढच्या वर्षी लवकर या जय घोषणा लहान थोरांनी एक मुखाने बोलत विसर्जन मिरवणुक काढली ... येणाऱ्या पावसाचा आनंद घेतला ...गणरायाचे आगमनापासून सर्वत्र पाऊस असल्याने गणराय विसर्जन दिवशी ही जोराचा पाऊस येत असल्याने चिमुकल्यांनीही पावसाचा मनसोक्त आनंद घेतला तसेच भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप दिला.