सोमेश्वरनगर ! करंजे वि.का.से.सोसायटी सण २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे वि.का.से.सोसायटी सण २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि ३० रोजी सोसायटी चेअरमन कृणाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
संस्थेचे भागभांडवल ७१ लाख ९९ हजार २५० रूपये आसून, बॅक कर्ज ३ कोटी ५३ लाख ३३ हजार ६६९ रूपये आहे.सभासद कर्ज ४ कोटी ४८ लाख ९४ हजार ४८४ आहे.संस्थेची सभासद संख्या ८१७ आसून सभासद ङेव्हीङंङ ५% जाहीर करण्यात आला आहे.ङेव्हीङंङ दिवाळी पूर्वी वाटप केली जाणार आहे जनरल मिटींग मध्ये सर्व विषयावर चर्चा झाली. थकबाकीदार सभासदांवर वसुली बाबतीत कार्यवाही करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.करंजे पंचक्रोशीतील सभासद संस्थेत आहेत.यावेळी संस्थेने नविन उद्योग व्यवसाय चालू करावेत. संस्थेच्या नफ्यात वाढ होऊन सभासदांना चांगल्या प्रकारे लाभांश वाटप करण्यात येईल या विषयावर देखील चर्चा झाली विषय वाचन सचिव दिपक शिर्के यांनी केले.यावेळी उपस्थित जेष्ठ सभासद शिवाजीराव गायकवाड , बाळासाहेब गायकवाड, बिंटूआण्णा शेंङकर, तानाजीराव गायकवाड,महेंद्र माणिकराव गायकवाड,बाळासाहेब गुलाबराव गायकवाड,मा.चेअरमन अनिल गायकवाड, मा.व्हा.चेअरमन महेंद्र शेंङकर , बाळासाहेब बाजीराव गायकवाड,करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड, सोरटेवाङी गावचे मा सरपंच दत्तात्रय शेंङकर,बाळासाहेब शेंडकर,राहूल शेंङकर, महेश शेंङकर,मा.चेअरमन अनिल गायकवाड,शिवाजीराव शेंङकर, शशिकांत गायकवाड, साहेबराव गायकवाड,शहाजी गायकवाड संचालक मंङळ व सभासद बंधू बहूसंख्येने उपस्थितीत होते.आभार व्हा.चेअरमन मच्छिंद्र शेंङकर यांनी मानले.